नागपूरः  महालातील कल्याणेश्वर मंदिराच्या विकासाचा आराखडा व नकाषा ख्यातनाम वास्तु विषारद कडून तयार करण्यात आला असून, या कामाला गती देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवावा, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी यांनी आज एका बैठकीत दिले.
नागपुरातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ना. श्री. गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार सर्वश्री प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मेट्रोचे एमडी श्रावण हर्डीकर, एमएसआयडीसीचे एमडी ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, सा. बां. विभागाचे मुख्य अभियंता श्री. नंदनवार, माजी महापौर दयाशंकर तिवारी, आर्किटेक्ट    श्री. भिवगडे, कल्याणेश्वर ट्रस्टचे सचिव गुणवंतराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
ना. श्री. गडकरी म्हणाले की, कल्याणेश्वर मंदिर हे शहराच्या मध्यभागी असून, लक्षावधी भाविकांच्या आस्थेचे ठिकाण आहे. या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या परिसराच्या विकासासाठी आराखडे व नकाशे तयार करण्यात आला आहे. हे विकास काम योग्यरीत्या पुढे नेण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.
गांधीबाग येथील जुन्या झालेल्या पोलिस वसाहतीच्या परिसरात अडिचशे ते तीनशे नवीन क्वार्टर्सचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित केले जात आहे. पार्किंग व्यवस्था तसेच इतर कमर्शियल वापरातून येणारया निधीतून या परिसराच्या पुनर्विकासाचे नियोजन करण्यात यावे, अशी सूचनाही ना. श्री. गडकरी यांनी केली.

ट्राफिक सिग्नल्स

शहरातील ट्राफिक सिग्नल्सची व्यवस्था सुधारण्यासंबंधी महापालिका आणि वाहतूक पोलिस यांनी नियोजन करावे, असे सांगून ना. श्री. गडकरी म्हणाले की, अनेक ठिकाणी सिग्नल्स कार्यरत नाहीत. काही ठिकाणी आवश्यक असूनही सिग्नल्स लावलेले नाहीत. याचा अभ्यास करून नियोजन व्हावे.
फुटाळा तलावात फ्लोटिंग म्युझिकल फाऊंटेनचे बांधकाम करण्यात आले आहे. याठिकाणी सोलर पॅनेल्सची व्यवस्था करून फाऊंटेनसाठी तसेच परिसरातील वापरासाठी सौर ऊर्जेची निर्मिती करण्यात यावी, अशी सूचना ना. श्री. गडकरी यांनी या बैठकीत केली.
नागपुरातील नेताजी मार्केट, कॉटन मार्केट, गोल बाजार, हरिगंगा बिल्डिंग, लोहा ओळी, पोहा ओळी, अनाज बाजार, दही बाजार, भाजी बाजार अशा सर्व बाजारांचा दर्जात्मक विकास करण्यासाठी नागपूर महापालिका आणि एमएसआयडीसी (महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कॉर्पोरेशन) यांनी एमओयू करून नागरिकांना व व्यापारयांना सोयी देण्याच्या दृष्टीने विकास कामांना गती द्यावी, असेही ना. श्री. नितीन गडकरी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here