नागपूर : नागपूरकरांच्या निरामय आरोग्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांच्या पुढाकाराने राबविल्या जात असलेल्या आरोग्य सेवा उपक्रमांचा भाग म्हणून 30 डिसेंबर 2023 ते  6 जानेवारी 2024 या काळात शहरात विविध ठिकाणी निःशुल्क कॅन्सर तपासणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. यात मोफत मॅमोग्राफी, पॅप स्मीयर टेस्ट, पीएसए टेस्ट, ब्लड कॅन्सर टेस्ट या चाचण्या केल्या जातील.
शिबिराचे उद्घाटन शनिवार, दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता केंद्रीय मंत्री, मा. श्री. नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते होणार आहे.

स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून वर्ल्ड कॅन्सर चॅरिटेबल सोसायटी, गुरुव्दारा प्रबंधन कमिटी आणि राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर इन्स्टिटयुटच्या सहकार्याने ही शिबिरे घेतली जातील. गर्भाशय मुख, स्तन, टयूमर इत्यादींची निःशुल्क कॅन्सर तपासणी या शिबिरांत होईल.
उत्तर नागपूरचे शिबिर दिनांक 30 व 31 डिसेंबर 2023 रोजी गुरुनानक पुरा, गुरुव्दारा समोरील मैदान, उत्तर नागपूर येथे होईल. या शिबिरासाठी श्री. परविंदर सिंह विज (9822225477) यांच्याशी संपर्क साधावा.
मध्य नागपूरचे शिबिर दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी स्व. तुशार मोरघडे क्रीडा मैदान, गाडीखाना ग्राऊंड, महाल, नागपूर येथे होईल. यासाठी डॉ. प्रंाजल मोरघडे (8857800477) यांच्याशी संपर्क साधावा.
दक्षिण नागपूरचे शिबिर दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी मोहता सायन्स कॉलेज, सक्करदरा चौक, नागपूर येथे होईल. यासाठी डॉ. श्रीरंग वरहाडपांडे (9766573802) यांच्याशी संपर्क साधावा.
पूर्व नागपूरचे शिबिर दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी भवानी माता मंदिर, पारडी, नागपूर येथे होईल. यासाठी डॉ. हरीष राजगिरे (8830108546) यांच्याषी संपर्क साधावा.
पष्चिम नगापूरचे शिबिर दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रषिक्षण केंद्र, प्रेरणा नगर, नागपूर येथे होईल. यासाठी डॉ. अंकित भांगे (8007496499) यांच्याषी संपर्क साधावा.
दक्षिण-पश्चिम नागपूरचे शिबिर दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी लक्षवेध, नरेंद्र नगर, नागपूर येथे होईल. यासाठी डॉ. अषोक पाटील (7744957867) यांच्याषी संपर्क साधावा
ही सर्व शिबिर सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळेत होतील. अधिक माहितीसाठी भारतीय जनता पार्टी, वैद्यकीय आघाडी, नागपूर महानगरचे अध्यक्ष डॉ. गिरीष चरडे (9823606363) यांच्याषी संपर्क साधता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here