नांदेड : अवधुत सपकाळ सध्याच्या २०२३/२४ सालीच्या दुसऱ्या राज्यस्तरीय पावरलिफ्टिंग स्पर्धेत द्वितीय तर राष्ट्रीय   पातळीवरील बेंगळुरू येथे प्रथम क्रमांकावर निवडल्या गेला आहे. म्हणून अवधुत सपकाळ यांचें  सर्वत्र कौतुक, मानसन्मान व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
         “अवधुत” नावातच एक प्रेरणास्रोत आहे, नावाप्रमाणेच एक सज्जन व्यक्तीमत्व त्यांनी स्वतःला व इतरांना आपल्यामध्ये व्यंग आहे हे कधीच जाणवून दिले नाही. जिवनात दुरदृष्टी, सकारात्मकता, प्रेरणादायी, आपल्याकडे जे काही आहे. त्याच्याशी अंतर्भूत होऊन विष्वापर्यत पोहोचवणं व जग जिंकण्याची अनुभूती करून देतेय.
अवधुत मारूती सपकाळ रा. लिंगनुर कनूल ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर जन्मजात अपंगत्व जातीने नाव्ही असल्यामुळे वडिलांचा मारूती सपकाळ यांचा पारंपारिक व्यवसाय आणि आई घरकाम व मोलमजुरी करणारीही. तीन भावंडे आहेत, घराची परिस्थिती तशी बेताचीच. तशाही परिस्थितीत शिक्षण घेण्याची आवश्यकता, व आवड सुद्धां. म्हणून बीए पर्यंत शिक्षण घेतले.
लहानपणापासून धष्टपुष्ट रहायची इच्छा होती. जन्मताच व्यंग असले तरी या व्यंगाचा जराही मला बाऊ करायचा नव्हता. हम भी कुछ कम नहीं। मन मे दम होता है तो कुछभी कर सकता है। अस अगदी लहानपणापासून वाटत होते. मात्र फक्त मोठी स्वप्न रंगवत बसलो नाही. प्रत्यक्षात व्यायाम सुरू केला. व्यायामात सातत्य ठेवले. व्यायाम करत असताना स्वतःची क्षमता लक्षात आली. त्यानुसार पाॅवरलिफ्टींग हा वैयक्तिक खेळ प्रकार निवडला. प्रशिक्षकांनी नेमकं मार्गदर्शन केले. आई-वडिलांनी पदरमोड करून स्पर्धेत उतरवले. इतक्या सर्व बाबींचा मिलाफ म्हणजे राष्ट्रीय पावरलिफ्टींग स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच यश होय. असे अवधूत मारुती संकपाळ अतिशय नम्रपणे सांगत होता. अवधूत लिंगनूर (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील. अवधूत जन्मजात अपंग. गावातच अवधूतच्या वडिलांचा नाभिक व्यवसाय. या व्यवसायाला कधीच मरण नाही,  मात्र खेडेगावात कितीसे पैसे मिळणार. अवधूतच्या शिक्षणाचा आणि सराव, स्पर्धेचा खर्च वाढत होता. वडिलांचे कष्ट कमी पडत होतें ,म्हणूनच अवधूतची आईही मोलमजुरी करायची. तीन भावंडात अवधूत मोठा. अप्रत्यक्षरीत्या या भावंडांची ही जबाबदारी अवधूत वर होती.
                  ही जबाबदारी पेलत, रोजचा सराव करत अवधूतने बी. ए. पर्यंत शिक्षण घेतले. शिक्षण घेत असताना सराव करण्यात आणि मार्गदर्शन घेण्यात असलीच कमतरता ठेवली नाही. गावात व्यायामाची सोय नव्हती म्हणून अवधूतने पाच किलोमीटरवर असलेल्या गडहिंग्लज येथे जाऊन व्यायाम सुरु केला. परिस्थिती आणि इर्षा माणसाला घडवते, हा अनुभव अवधूतलाही आला. वर्ग मित्र आणि स्नेह्यांनी माझी दखल घेतली नाही. ही सल मनात होती.
              या वेदनेतूनच अवधूतला प्रेरणा मिळाली. कसून व्यायाम सुरू केला. एक एक स्पर्धेत उतरत होताच आणि; यश मिळत होते. जिल्हास्तरीय पावरलिफ्टींग स्पर्धेत २०१७ साली अवधूत पहिल्यांदा उतरला. या स्पर्धेत अवधूत विजयी झाला आणि त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेत थाळी फेक व गोळा फेक या खेळ प्रकारात अवधूतला पहिला क्रमांक मिळाला. या यशामुळे अवधूतची पंचकुला (हरियाणा) येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली. इतक्या लांब स्पर्धेसाठी जाण्यासाठी अवधूतकडे पैसे नव्हते. आई-वडिलांनी पैशाची तजवीज करून अवधूतला स्पर्धेसाठी पाठवले. मात्र पुरेसा आणि सराव कमी पडल्याने अपयश आले.
                   तरीही खंत बाळगली नाही. नव्याने जय्यत तयारीनिशी अवधूतने कोल्हापुरात प्रशिक्षण घेण्याचे ठरविले. याचबरोबर पावरलिफ्टींग बेंच खेळ निवडला. सरावासाठी दररोज अवधूत कोल्हापूरला येत होता.
              कोलकाता येथे २०२१ साली झालेल्या पावरलिफ्टींग स्पर्धेत अवधूतने भाग घेतला. अहमदनगर येथे २०२२ साली झालेल्या राज्यस्तरीय पावरलिफ्टींग स्पर्धेत अवधूतचा दुसरा क्रमांक आला. पुढे राष्ट्रीय पावरलिफ्टींग स्पर्धेतही (दिल्ली) अवधूत सहभागी झाला. कल्याण येथे झालेल्या राज्यस्तरीय पावरलिफ्टींग स्पर्धेत अवधूतला व्दितीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेनंतर बेंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय पावरलिफ्टिंग स्पर्धेत अवधूतने प्रथम क्रमांक मिळविला. राष्ट्रीय पावरलिफ्टिंग स्पर्धेतील उज्वल यशामुळे अवधूत प्रकाश झोतात आला.
            अवधूत या यशावर समाधानी नाही. त्याला राष्ट्रकुल, आशियायी, पॅराऑलिम्पिक स्पर्धाही गाजवण्याचा तयारी ठेवतो आहे. या स्पर्धेसाठी अवधूतला अनेक शुभेच्छा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here