सालेकसा : संताजी जगनाड़े महाराज हे आमच्या समाजात जन्मले व समाजाचा चौमुखी विकास कसे होईल हे आपल्या अभंगातून विचाराच्या माध्यमाने सांगून गेले. परंतु सोकांतिका ही की आजही आमच्या समाजाला संताजी काय सांगून गेले हेच माहीत नाही. तरी त्यांनी दिलेल्या विचारांना पुस्तकाच्या माध्यमातून वाचन करून त्यांचे विचार आपल्या जीवनात आत्मसात करण्याची आज वेळ आल्याचे दिसून येत आहे. तरी सकल समाज बांधवांनी संताजीचे विचार आत्मसात करावे असे सालेकसा (आमगाव खुर्द) येथे विदर्भ तेली समाज महासंघ सालेकसाच्या वतीने आयोजित समाज मेळावा व संताजींच्या जयंती समारोह कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलताना संघाचे तालुका उपाध्यक्ष गुणाराम मेहर यांनी उपस्थिताना संबोधित करताना प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की समाजाला अंधवीश्वासापासून दूर राहण्याची अत्यंत गरज आहे कारण अंधविश्वासामुळे समाज दिवसें-दिवस मागे जात आहे.
             यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष हिरालालजी साठवणे उपस्थित होते तर सह-उद्घाटक विजय येरने, कृष्णा येरने, गुलाबजी मदनकर उपस्थित होते. पुंडलिक हटवार (गुरुजी), वसंत बळवाईक, सौ. मिना बावनकर, ध्रुव हुकरे, बालकृष्णजी मोटघरे, शंकरजी कावळे, बबनराव चकोले, श्रीराम कापसे, नानाजी कावळे, परसराम मोटघरे, जैराम चकोले, भरतराम मोटघरे, तेजराम मदनकर, मिरनबाई मोटघरे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष म्हणून भाऊरावजी मोटघरे उपस्थित होते.
            यावेळी विभिन्न क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यात कुमारी कांची कापसे, विवेक मोटघरे, श्वेता हटवार, गुंजन चकोले, वैष्णवी गिऱ्हेपुंजे यांचा स्मृतिचिन्हे व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आमगांव खुर्द शाखाप्रमुख संतोष कापसे यांच्या नेतृत्वात जितेंद्र मोटघरे, संतोष गिरेपुंजे, धनराज चकोले, मुकेश चकोले, हेमराज बावनकर, राजू गभने, शैलेश चकोले, सुशील गभने, महेंद्र कापसे, राहुल साठवणे, वसंत भेलावे, भुरेलाल, रवी गभने, लेखराम चकोले, शुशील गभने, महेंद्र कापसे, राहुल साठवने, वसंत भेलावे, रवि गभने, लेखराम चकोले, पायल गभने, पिंकी कापसे, टेकचंद मोटघरे, किशोर मोटघरे आदिंनी खुप परिश्रम केले.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सचिव रविजय मोटघरे व आभार प्रदर्शन जितेंद्र मोटघरे यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. या प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम व सुरुचीभोज ची खास व्यवस्था करण्यात आलेली होती, हे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमात शाळकरी मुले-मुली, विद्यालय-महाविद्यालयीन मुले-मुली व समाज बांधवांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here