महाराष्ट्राच्या अगदी पूर्व टोकावरील तालुका म्हणजे सालेकसा ग्रामीण भागातील कलावंतांना त्यांच्या कला- गुणांना सादर करण्यासाठी फारसे मंच उपलब्ध नसतात मात्र सामाजिक कार्यासाठी परिचित असलेल्या प्रेरणा मित्रपरिवार द्वारा सालेकसा महोत्सवाचे आयोजन करून परिसरातील कलावंतांसाठी उभारलेले उत्कृष्ट मंच आहे. परिसरातील स्पर्धकांसाठी आपले कलागुण सादर करण्यासाठी ही संधी आहे स्पर्धकांनी या संधीचे सोने करून घ्यावे व आपल्या कला सादर करावेत असे आवाहन मागासवर्गीय बहुउद्देशीय शिक्षण संस्था रेंगेपारचे सचिव राजेंद्र बडोले यांनी केले. ते यावेळी प्रेरणा मित्रपरिवार द्वारा आयोजित सालेकसा महोत्सव प्रसंगी प्रमुख अतिथी स्थानावरून बोलत होते.
         महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरील सालेकसा येथे सालेकसा महोत्सवाचे सुनिश्चित आयोजन नित्य नियमाने प्रत्येक वर्षी केले जात असते. हे बारावे वर्ष असून यावर्षी सुद्धा सालेकसा महोत्सवाचे सुनिश्चित आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, वीर बिरसामुंडा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून फीत कापून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले हे होते तर याप्रसंगी उद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे हे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाला दीपप्रज्वलक म्हणून पंचायत समिती सालेकसाचे गट विकास अधिकारी रवींद्र पराते प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची प्राचार्य बी. एन. तुमडाम, महिला व बालकल्याण अधिकारी यशोधरा मेंढे, सालेकसा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक मयुरी नागदिवे, पर्यवेक्षक एस. झेड. बनोठे, अभिनव विद्यामंदिर संस्थापक मनोज अग्रवाल, सालेकसा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश वैद्य, एपीजे स्कूलचे प्राचार्य पराग फुंडे, अभिनव विद्यामंदिर प्राचार्य शैलेश  माहुले, प्रेरणा मित्र परिवार सदस्य विकास बोपचे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.  विविध स्पर्धांच्या परीक्षणासाठी मेघा ठाकूर, विध्या धूर्वे, अल्का बावणे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी यावेळी स्वीकारली.
                कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेरणा मित्र परिवाराचे सदस्य पवन पाथोडे यांनी मांडले व प्रेरणा मित्र परिवाराची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. गणेश भदाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. राकेश रोकडे यांनी मानले. उद्घाटनादरम्यान लगेचच समुह नृत्य स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा व गीत गायन स्पर्धांच्या महासंग्रामास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मधुकर हरिणखेडे, नेपाल पटले,  विजय मानकर, सचिन बहेकार, निलेश बोहरे, सूर्यकांत येडे, मनोहर कटरे, विजय फुंडे, सतीश अग्रवाल, नरेंद्र कुमार नागपुरे, संदीप अग्रवाल, निक्की बागडे, ओम नेवारे, सुरेंद्र बिसेन, ब्रजभूषण बैस, मनोज डोये, मनोज सरनागत, राजेंद्र बिसेन, उपेंद्र पटले, सतीश पटले, सुनील असाटी, प्रकाश टेंभरे, यशवंत शेंडे, दिनेश मानकर, कृष्णा मेंढे, किरण मोरे, संगीता चौरे, अनिता बोरकर, लता दोनोडे, वंदना मेश्राम, सीमाताई चंदेल, कंचनताई गोल्लीवार, अर्चना चुटे, कविताताई येटरे, दिपालीताई बारसे,  छायाताई ब्रह्मवंशी, कु. स्नेहारिका पटले तसेच प्रेरणा मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
आज होणार विधानसभा गौरव सन्मान
           सालेकसा महोत्सवात सालेकसा आमगाव देवरी तालुक्यातील उल्लेखनीय कामगिरी बजावत असलेल्या विविध क्षेत्रातील विशिष्ट व्यक्तींचा विधानसभा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. यामध्ये प्रगतीशील शेतकरी हंसराज रहिले, कुशल राजनितीज्ञ विजय शिवणकर, कुशल महिला राजनितीज्ञ सविता पुराम, समाजसेवक बबलु कटरे, विकासाभिमुख सरपंच मनोज बोपचे, शिक्षण महर्षी सावळाराम बहेकार, कुशल व्यवसायिक लखन अग्रवाल, कर्तव्यनिष्ठ अधिकारी अमित खोडणकर, सेवाभावी डॉक्टर शैलेश भसे, उपक्रमशील शिक्षक मिलिंद चौधरी, आणि उद्यमशील उद्योगपती जितेन्द्र बल्हारे या सर्वांचा सन्मान करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here