नागपूर : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती च्यावतीने दि. ४ डिसेंबर पासून राज्यव्यापी संप पुकारण्यांत आला. संपाच्या निमित्ताने आजपासून दि.२९.१२.२०२३ रोजी बेमुदत संपाच्या अनुषंगाने सिटू व हिंद मजदूर सभा हयांचे संयुक्तरित्या संविधान चौक येथे सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत धरणे, निदर्शने आंदोलन करण्यांत येत आहेत.
रोज हजारो अंगणवाडी कर्मवारी हया धरणा आंदोलनात सामील झालेल्या आहेत व आकनक पध्दतीने आपल्या मागण्यांच्या घोषणांनी संविधान चौक दणाणूण सोडीत आहेत. कार्यक्रमाचे शेवटी राष्ट्रगीत गावून कार्यक्रमाची सांगता करण्यात येते. शासकीय कर्मचा-यांचा दर्जा मिळालाच पाहिजे, किमान वेतन रु. २६००० मिळाले पाहिजे, ग्रॅज्युटी व पेन्शन मिळाले पाहिजे. महाराष्ट्र शासनाचा निषेध असो, अशा गगनभेदी ना-यांनी परिसर दूमदूमून जात आहे पण अजुनही राज्य सरकारने त्यांच्या ह्या संपाची दखल घेतलेली नाही. ज्ञात असू द्यावे कि अंगणवाडी कर्मवा-यांनी सिटूच्या नेतृत्वाखाली विधानसभा अधिवेशन काळात २०,००० हजारांचा विशाल मोर्चा काढला होता व मा. मंत्री महोदय हयांना निवेदन सादर केले होते. चर्चा पण करण्यात आली. पण तोडगा निघालेलाच नाही. अंगणवाडी कर्मचारी भगिनी दि. ३ जानेवारी पासून आझाद मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत. नागपूर येथील धरणा कार्यकमाचे नेतृत्व कॉ. विठठल जुनघरे, कार्याध्यक्ष अंगणवाडी संघटना, सिटू महासचिव कॉ. दिलीप देशपांडे, कॉ. मंगला जुनघरे सिटू कोषाध्यक्ष, अंगणवाडी राज्य महासचिव, चंदा गेंढे, अध्यक्ष शशी काळे, कोषाध्यक्षा, प्रिती पराते, मनीषा बेले, मीना पाटील, मीनाक्षी फुलडोले, माधुरी जामगडे, शामली शैसारे, पुष्पा सवाईयूल, गीता बागडे, किरण गणवीर, लता साठवणे, लीला बन्सोड, सीमा साखरे, मंगला गजभीये, लीला उईके, चंदा मारीया, पौर्णिमा वालदे, कविता मेश्राम अनिता जनबंधु हया धरणा कार्यक्रमाला आदी परिश्रम घेत आहेत. कॉ. गुरुप्रित सिंह यांनी संबोधित केले. हया कार्यक्रमात हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस नागपूर शहरातून उपस्थित राहत आहेत. पण अजुनही राज्य सरकारने हया आंदोलनाची दखल घेतलेली नाही. अंगणवाडीच्या संपास कामगार संघटना संयुक्त कृति समिती व नागपूरच्या सर्व ट्रेड युनियन्सनी समर्थन जाहीर केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here