Home निवडणूक 2026 Maharashtra Municipal Elections : अर्ज भरण्याचा शुभ मुहूर्त कोणता? कोणत्या दिवशी अर्ज...

Maharashtra Municipal Elections : अर्ज भरण्याचा शुभ मुहूर्त कोणता? कोणत्या दिवशी अर्ज टाळावा?

0
78
– महानगरपालिका निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने?
– ज्योतिषाचार्यांनी ग्रहमानासह सगळंच सांगितलं- राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी 
– उमेदवारी अर्जांपासून विजयापर्यंतचं ज्योतिषीय गणित उघड
नागपूर | विशेष प्रतिनिधी

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून राजकीय वातावरण तापलं आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते विजयाच्या गणितापर्यंत सर्वच आघाड्यांवर हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्योतिषाचार्यांनी महानगरपालिका निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण भाष्य करत शुभ मुहूर्त, वर्ज्य तारखा आणि संभाव्य विजयाबाबत अंदाज व्यक्त केला आहे.

निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सर्वच पक्ष तयारीला लागले असून सध्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अर्ज भरण्याचा योग्य दिवस आणि वेळ कोणता असावा, याबाबत अनेक उमेदवार संभ्रमात आहेत.

अर्ज भरण्यासाठी शुभ व वर्ज्य तारखा कोणत्या?
ज्योतिषाचार्यांच्या माहितीनुसार,
शनिवार 27 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते 5 हा अर्ज भरण्यासाठी शुभ मुहूर्त आहे.
रविवार 28 डिसेंबर हा मध्यम स्वरूपाचा दिवस मानला जातो.
सोमवार 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 11 आणि दुपारी 12.30 ते 5 हा काळ अत्यंत शुभ आहे.
मात्र मंगळवार 30 डिसेंबर रोजी कोणताही शुभ मुहूर्त नसल्याने या दिवशी अर्ज भरणे टाळावे, असा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे.
याबाबत पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, अमरावतीसह राज्यभरातून मोठ्या प्रमाणात चौकशी होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
महापालिका निवडणुकीत कोणाला मिळणार यश?
या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार असली तरी ग्रहमानाचा अभ्यास करता महायुतीला स्पष्ट यश मिळेल, असा अंदाज ज्योतिषाचार्यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील बहुतांश महानगरपालिकांमध्ये महायुतीचाच वरचष्मा राहील, असंही ते म्हणाले.
तसंच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ग्रहमान सध्या अत्यंत अनुकूल असून निवडणूक काळात ते प्रभावी ठरणार असल्याचं संकेत देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री साडेसातीच्या प्रभावाखाली, पण पुढे मोठी संधी…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या साडेसातीच्या प्रभावाखाली असले तरीही त्याचा निवडणूक निकालावर फारसा विपरीत परिणाम होणार नाही, असं मत व्यक्त करण्यात आलं आहे. जून 2027 नंतर त्यांच्या राजकीय वाटचालीत मोठा टप्पा येईल आणि केंद्र सरकारमध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भविष्यात राष्ट्रीय पातळीवर त्यांची भूमिका अधिक निर्णायक ठरू शकते, असाही संकेत देण्यात आला.
महापालिका निवडणुकीच्या महत्त्वाच्या तारखा
उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत: 23 ते 30 डिसेंबर
अर्ज छाननी: 31 डिसेंबर
मतदान: 15 जानेवारी 2026
मतमोजणी व निकाल: 16 जानेवारी 2026
राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवडसह एकूण 29 महानगरपालिकांतील 2869 जागांसाठी मतदान होणार आहे.