Home नागपूर परिवहन मंत्री अचानक हिंगणा बसस्थानकाला भेट देतात तेव्हा…

परिवहन मंत्री अचानक हिंगणा बसस्थानकाला भेट देतात तेव्हा…

0
63

नागपूर : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज कोणतीही पूर्वसूचना न देता हिंगणा बसस्थानकाला अचानक भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली. नव्या बसस्थानक इमारतीच्या बांधकामाचा वेग, दर्जा आणि प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी महिलांसाठी उभारण्यात येत असलेल्या ‘हिरकणी कक्षां’चीही सविस्तर माहिती घेतली. बसस्थानकाच्या दैनंदिन सोयीसुविधा, प्रवाशांच्या अडचणी आणि कर्मचारी व्यवस्थापन याबाबतही त्यांनी तत्काळ चौकशी केली.

यापूर्वी मंत्री सरनाईक यांनी शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले.

या पाहणीदरम्यान राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक श्रीकांत गभणे, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा प्रादेशिक व्यवस्थापक माधव कुसेकर, विभाग नियंत्रक विनोद चौरे, विभागीय वाहतूक अधिकारी रंजू घोडमारे, अभियंत्रचालक श्री. नेवारे, इमामवाडा आगार व्यवस्थापक इम्रान खान तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

मंत्र्यांच्या या अचानक भेटीमुळे बसस्थानकातील गतीमान कामांबाबत अधिकाऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून, प्रवाशांच्या सुविधांमध्ये अपेक्षित सुधारणा करण्यास अधिक चालना मिळेल, अशी स्थानिकांची प्रतिक्रिया होती.