Home नागपूर बिबट्याचा हल्ला; फडणवीस रुग्णालयात

बिबट्याचा हल्ला; फडणवीस रुग्णालयात

0
78
नागपूर | प्रतिनिधी

पारडी येथे अलीकडेच बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारडी येथील भवानी रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली.

नागपुरातील गजबजलेल्या पारडी परिसरातील शिवनगर वस्तीत १० डिसेंबर रोजी बिबट्याने हल्ला केल्याने खळबळ उडाली होती. घरांमध्ये घुसून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले होते. जखमींना पारडी येथील भवानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेऊन त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देवून संबंधित डॉक्टरांना त्यांनी उपचाराच्या दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.