Home मनोरंजन धुरंधरमधील ‘शरारत’ गर्ल क्रिस्टल डिसूझाने इंस्टाग्रामवर लावली आग

धुरंधरमधील ‘शरारत’ गर्ल क्रिस्टल डिसूझाने इंस्टाग्रामवर लावली आग

0
57
मुंबई | बॉलिवुड प्रतिनिधी
सध्या सर्वत्र धुरंधर या सुपरहिट चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील गाजलेल्या ‘शरारत’ गाण्यातील अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच तिने तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, या फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवली आहे.

क्रिस्टलने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती चमकदार बॉडीकॉन ड्रेस, डायमंड ब्रेसलेट आणि फिंगर रिंगमध्ये अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. हाय हील्समध्ये स्टायलिश पोझ देत तिने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. फोटो शेअर करताना तिने कॅप्शन दिलं आहे – “बाहर और अंदर तूफान”.

या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रेम केलं आहे. अनेकांनी हार्ट आणि फायर इमोजीचा पाऊस पाडला असून,
“तू खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसतेस”,
“वाह! काय लूक आहे”
अशा प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, धुरंधर चित्रपटातील ‘शरारत’ गाण्यात क्रिस्टल डिसूझाने केलेला डान्स प्रेक्षकांना विशेष भावला आहे. तिच्या एनर्जेटिक डान्स मूव्ह्जचं सर्वत्र कौतुक होत असून, बिग बॉस 17 फेम आयेशा खान देखील या गाण्यात झळकली आहे.

क्रिस्टल डिसूझाने 2007 साली ‘कहेन ना कहें’ या टीव्ही शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘क्या दिल में है’, ‘कस्तुरी’, ‘किस देश में है मेरा दिल’ अशा लोकप्रिय मालिकांमधून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

एकीकडे धुरंधरची यशस्वी घोडदौड सुरू असताना, दुसरीकडे क्रिस्टलचे हे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.