Home महाराष्ट्र Heavy Rain Alert | थंडीचा कडाका आणि मुसळधार पावसाचा दुहेरी इशारा! 28...

Heavy Rain Alert | थंडीचा कडाका आणि मुसळधार पावसाचा दुहेरी इशारा! 28 ते 31 डिसेंबरदरम्यान काय होणार?

0
56
Transparent umbrella under heavy rain against water drops splash background. Rainy weather concept.
पुणे | प्रतिनिधी

Maharashtra Weather Update :
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देशभरात हवामानाने अचानक कलाटणी घेतली असून, एका बाजूला कडाक्याची थंडी तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 28, 29, 30 आणि 31 डिसेंबरदरम्यान देशाच्या विविध भागांत जोरदार पावसासह थंडीच्या लाटेचा अलर्ट जारी केला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट सक्रिय
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपूर्वी थंडी कमी झाली होती. मात्र, आता उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुन्हा एकदा गारठा वाढताना दिसत आहे. संपूर्ण डिसेंबर महिन्यात राज्याने थंडीचा कडाका अनुभवला असून, पुढील काही दिवसांत थंडी आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
नीचांकी तापमानाची नोंद :
धुळे – 7°C
आहिल्यानगर – 7.3°C
परभणी – 7.5°C
निफाड – 7.4°C
नागपूर, गोंदिया, भंडारा, नाशिक – 10°C
या भागांमध्ये पहाटे आणि रात्री प्रचंड गारवा जाणवत असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
देशाच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा
मॉन्सून संपूनही देशातून पावसाचे ढग हटण्याचे नाव घेत नाहीत. विशेषतः केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल या भागांमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
28 ते 31 डिसेंबरदरम्यान केरळच्या अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई, पुणे, दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाचा धोका वाढला
हवामान बदलासोबतच देशातील मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषण गंभीर पातळीवर पोहोचले आहे.
मुंबईत अनेक भागांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 200 च्या पुढे गेला असून हवा आरोग्यासाठी घातक ठरत आहे.
प्रदूषण वाढण्याची प्रमुख कारणे :
वाहनांची वाढती संख्या, सुरू असलेली मोठ्या प्रमाणावरील बांधकामे, कमी वेगाचे वारे, ज्यामुळे प्रदूषक हवेतच अडकतात
यामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, घसा दुखणे, श्वसनाचे विकार आणि तापाच्या तक्रारी वाढल्या आहेत.
डॉक्टरांचा सल्ला :
श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, गरज असल्यास मास्कचा वापर करावा.
नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना
थंडी आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. प्रदूषण जास्त असलेल्या भागात सकाळी व संध्याकाळी फिरणे टाळावे. हवामान विभागाच्या अपडेट्सकडे लक्ष ठेवावे